*शहरी आणि ग्रामीण भागातील गैस सिलिंडर चा वाढता तुटवडा, ग्राहकांना भेडसावणाऱ्या लांबच लांब रांगा*
*जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना शिष्टमंडळांनी दिले निवेदन*
शहरी आणि ग्रामीण भागातील गैस सिलिंडर चा वाढता तुटवडा, ग्राहकांना भेडसावणाऱ्या लांबच लांब रांगा आणि सदोष वितरण प्रणालीची गंभीर दखल घेऊन मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका व सचिव आणि इतर अधिकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांची भेट घेऊन निवेदन सादर करून परिस्थितीची माहिती दिली. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सर्वसामान्य जनता विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, आणि रोजंदारी कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या. सकाळपासून लांब लांब रांगेत उभे राहणे आणि घरपोच गैस वितरण बंद असणे या सारख्या समस्या वर प्रकाश टाकन्याय आला.गैस ऑपरेटरच्या वितरण प्रणालिवर ऑनलाइन बुकिंग करूनही सिलिंडर उपलब्ध ना होने आणि ऑनलाइन बुकिंग मधे येणाऱ्या अडचणी वर प्रकाश टाकण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आनंद पडोळे यांनी तत्काळ कारवाई चे निर्देश दिले आणि परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला जाईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात ग्राहक न्याय परिषदेचे प्रमुख डॉ विप्लव मजूमदार,श्री संदीप हाडके,श्री मोहन ठाकरे आणि अंकिता नगरारे उपस्थित होते.
👆🏾
